श्रद्धा • परंपरा • शास्त्र

प्रत्येक विधी हा केवळ, एक संस्कार नसून, तो जीवनाला आध्यात्मिक दिशा देणारा अनुभव आहे.

प्रत्येक यजमानाला योग्य मार्गदर्शन, पारदर्शक सेवा आणि समाधानकारक धार्मिक अनुभव देणे हीच आमची सेवा आहे.

Our Mission

परंपरेचे रक्षण आणि शास्त्रोक्त सेवा

“त्र्यंबकेश्वर क्षेत्राच्या पवित्र भूमीत, पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या प्राचीन वैदिक परंपरेचे रक्षण करणे आणि प्रत्येक विधी पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडणे हे आमचे ध्येय आहे.

कालसर्प शांती, नारायण नागबळी यांसारख्या महत्त्वाच्या पूजा केवळ एक विधी म्हणून नव्हे, तर यजमानाच्या जीवनातील अडचणी दूर करून त्यांना आध्यात्मिक शांती आणि समाधान मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

Our Vision

विश्वासाचा वारसा आणि सोपी सेवा

सनातन धर्मातील शुद्ध, पारदर्शक आणि शास्त्रोक्त पूजाविधींची सेवा जगभरातील भाविकांपर्यंत सोप्या व सुलभ पद्धतीने पोहोचवणे.

प्रत्येक यजमानाला योग्य धार्मिक मार्गदर्शन, मंत्रोच्चाराची शुद्धता आणि आदरयुक्त सेवा देऊन त्यांच्या मनात श्रद्धेचे आणि विश्वासाचे अढळ स्थान निर्माण करणे, हे आमचे ध्येय आहे.

Experience & Expertise

आपल्या श्रद्धेला मिळणारा शास्त्रोक्त आधार

पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेले ब्राह्मणी संस्कार आणि वैदिक ज्ञानाच्या बळावर आम्ही प्रत्येक पूजाविधी संपूर्ण विधीविधानाने पार पाडतो.

सनातन परंपरा

शास्त्रोक्त विधी व धर्मशास्त्र

पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या प्राचीन पद्धती, ग्रंथ आणि संदर्भांना धरूनच आम्ही प्रत्येक पूजाविधी संपूर्ण निष्ठेने पार पाडतो.

शुद्ध मंत्रोच्चार

वेदपाठ आणि मंत्रसिद्धी

आमच्या वेदशास्त्रसंपन्न गुरुजींकडून होणाऱ्या स्पष्ट, शुद्ध आणि शास्त्रोक्त मंत्रोच्चारामुळे पूजेचे पूर्ण फळ यजमानाला मिळते.

यजमान समाधान

वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन

केवळ पूजा करणे नव्हे, तर तुमच्या कुळाचारानुसार, पत्रिकेतील दोषांनुसार आणि समस्यांनुसार तुम्हाला योग्य तोच विधी सुचवून मार्गदर्शन केले जाते.

उत्तम व्यवस्था

साहित्य, राहणे व भोजन सोय

त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या यजमानांसाठी पूजेचे सर्व साहित्य, राहण्याची सोय आणि भोजनाची उत्तम व्यवस्था आम्ही स्वतः करतो.

भाविकांचा आमच्यावरील विश्वास

गेली अनेक वर्षे देश-विदेशातून येणारे भाविक गोदातीर्थावर पूर्ण श्रद्धेने येतात. केवळ विधी पूर्ण करणे नव्हे, तर यजमानाच्या प्रत्येक समस्येला समजून घेऊन धर्मशास्त्रानुसार योग्य मार्गदर्शन करणे हीच आमची खरी ताकद आहे.

पारदर्शक कारभार, स्पष्ट संभाषण, पूजेची संपूर्ण तयारी आणि विधींमधील पवित्रता यांमुळेच हजारो यजमानांचा आमच्यावर अढळ विश्वास आहे

आमचे वेदशास्त्रसंपन्न गुरुजी

तुषार जोशी गुरुजी

सत्यम जोशी गुरुजी

रोहित राजहंस गुरुजी

दत्तात्रय दीक्षित गुरुजी

सुरेंद्र खरे गुरुजी

यश आणि परंपरेचा वारसा

वर्षे

समृद्ध वैदिक परंपरा आणि कर्मकांडाचा प्रदीर्घ अनुभव.

%

शास्त्रोक्त विधी

गुरुजींकडून धर्मशास्त्रानुसार आणि पूर्ण निष्ठेने होणारे पूजाविधी.

समाधानी यजमान

देश-विदेशातून आलेल्या भाविकांचा दृढ विश्वास.

दिवस मार्गदर्शन

पूजेपूर्वी आणि पूजेनंतर यजमानांना योग्य सल्ला व सहकार्य.